नम्सकार माझ्या मित्रांनो आज आपन या पोस्ट मध्ये तुळशी विवाह निमित्त काही तुळशी विवाह वरती मराठी उखाणे Tulshi Vivah Marathi Ukhane तुळशी विवाह मंगलआष्टका Tulshi Vivah Mangalaashtika आणि तुळशी विवाह ची मराठी मधल्या काही ओवी Tulshi Vivah Marathi Vovvi व त्याबरोबर तुळशी विवाह च्या दिवशी तुमच्या घरापुठे काही रांगोळी Tulshi Vivah Rangoli ची फोटो व तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त Tulshi vivah Shubh Muhart किती वाजता आहे या सर्व वरती आपल्या मराठी भाषा मध्ये माहिती दिली आहे चला सुरू करूया आपल्या या पोस्ट ला हि माहीती तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रीनी पर्यंत नक्की शेयर करा
या मध्ये तुम्हाळा तुळशी विवाह चे मराठी उखाणे ,रांगोळी,तुळशी विवाह ची मराठी ओवी, तुळशी विवाह मंगळआष्टीका, तुळशी मातेचे फोटो, तुळशी ची आरती,
Tulshi Vivah Marathi Ukhane |Tulshi Vivah Mangalaashtika| Tulshi Vivah Marathi Vovvi|Tulshi Vivah Rangoli |Tulshi vivah Shubh Muhart
👉तुळशी विवाह चे उखाणे
Post Name | URL |
---|---|
Navardevache Ukhane | Click Here |
Navriche Ukhane | Click Here |
Dohale Jevan | Click Here |
Shivaji Maharaj | Click Here |
Vadhu Marathi Ukhane | Click Here |
Var Marathi Ukhane | Click Here |
Sanache Ukhane | Click Here |
Comedy Ukhane | Click Here |
Chavat Ukhane | Click Here |
Makar Sankarant Ukhane | Click Here |
Marathi Suvichar | Click Here |
Attitude Status | Click Here |
Ghas Bharvaniche Ukhane | Click Here |
Zingaat Status | Click Here |
19 Febuvary | Click Here |
Instagram Status | Click Here |
Marathi Mhanni | Click Here |
Latest Marathi Ukhane | Click Here |
लक्ष्मीमाते पुढे ठेवल्या फुलांच्या राशी ...रावांचे नाव घेते तुळशी विवाहच्या दिवशी
तुळशीला आल्या मोत्यांच्या मंजुळा ...रावांचे नाव घेवुन सांगते आज आहे तुळशीच्या लग्नाचा सोहळा
अंगणी काढल्या रांगोळी दारी लावल्या तोरण माळा ...रावांना आवडतात तुळशीमातेच्या हिरवागार मंजुळा
तुळस माझी हिरवीगार जन्म तिचा रविवार आणि ...राव माझे जन्माचे साथिदार
तुळशीच्या लग्नाला घातला मि कोल्हापुरी साज ...राव बघुन म्हणाले मला वा ...काय सुंदर दिसतीय आज
लग्नानंतर पहिला तळशी विवाह साजरा करते उत्साहाने...रावांचे नाव घेते प्रेमाने
पैठणची पैठणी कोल्हापुरचा साज ...रावांचे नाव घेते तुळशीमाताचे लग्न आहे आज
मराठीतील नवीनतम तुळशी विवाह मराठी उखाणे ( तुळशी विवाह वरती मराठी उखाणे) फक्त Kadak Marathi Ukhane या वेबसाईट वरती आम्ही नेहमी या तुळशी विवाह या श्रेणीतील मराठी तुळशी विवाह मराठी उखाणे प्रत्येक सणांवर मराठी उखाणे अपडेट करतो जेणेकरून तुम्हाला नवीनतम आणि नवीन तुळशी विवाह चे मराठी उखाणे मिळतील तुमच्या मित्रांना मराठीत तुळशी विवाह चे मराठी उखाणे किंवा सणांचे मराठी उखाणे पाठवा आणि तुळशी विवाह सोहळा या सणाचा आनंद घ्या त्यांच्यासोबत शेअर करा आमच्या तुळशी विवाह मराठी उखाणे या संग्रहाचा मराठीत आनंद घ्या आणि उखाणे चॅलेंज मराठी उखाणे मराठी फॉन्टमध्ये तुमच्या Facebook आणि Whatsapp मित्रांसह शेअर करा तुमच्या मित्रांना तुळशी लग्नाचा मराठी उखाणा घेवुन शुभेच्छा द्या तुळशी मातेचे मराठी उखाणे तुळशी विवाह किंवा प्रत्येक सणांचे मराठी कडक उखाणे नव्या नवरीला तुळशी विवाह वरती उखाणा घे असे म्हणतात अशा वेळी या उखाण्यातील एखादा उखाणा घेयाचा चला सुरू करूया तुळशी विवाह स्पेशल मराठी उखाण्याला आजचे काही खास उखाणे आहे
👉तुळशी विवाह मंगळआष्टका
🚩मंगलाष्टक श्लोक🚩
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं
बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणिं थेऊरं
लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओझरं
ग्रामो रांजणसंस्थितं गणपतीकुर्यात् सदा मंगलम् ।। १ ।।
गंगा सिंधु सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा
कावेरी शरयु, महेंद्रतनया चर्मण्वती वेदिका
क्षिप्रा वेदवती महासुरनदी ख्यातातया गंडकी
पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम् || २ ||
लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा:
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः
अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।
राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी
ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे
आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।
लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी
रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा
धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।
लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल
गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।
विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी
सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी
रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता
तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।
आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा
दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी
वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।।
👉तुलसी पूजन मंत्र मराठी
तुलसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी। धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।। लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्। तुलसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।
तुळशी विवाहाची पूजा कशी करावी मराठीत | तुळशी चा विवाह कसा लावावा मराठी | Tulsi च्या lagna chi puja kashi करायची
तुळशीचे वृंदावनाची गेरू चुन्याने आणि फुलांनी सजवा.
त्यावर बोर चिंच आवळा, कृष्णदेव सावळा असे लिहितात. बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात
तुळशीला हळद व तेल लावून मंगल स्नान घालावे
तुळशीच्या रोपाभोवती उसाचा मंडप बनवा
तुळशीच्या रोपावर लाल ओढणी अर्पण करा
तुळशीला बांगड्या नथ आणि मेकअपच्या इतर वस्तू अर्पण करा
श्री गणेश आणि शालीग्रामची ( भगवान विष्णू ) विधिवत पूजा करावी.
भगवान शालिग्रामच्या मूर्तीचे सिंहासन हातात घेऊन तुळशीची सात प्रदक्षिणा करा.
नंतर तुलसीची आरती मराठीत म्हणावी व नंतर लग्नात म्हणतात त्या मंगलाष्टके गाण्याने विवाह सोहळा पूर्ण केला जातो.
तुळशीचे लग्न कधी लावावे वेळ व मुहूर्त | तुळशीची पूजा करण्याची वेळ
तुळशीची पूजा तुळशीचे लग्न संध्याकाळी 6.30 ते 7.40 दरम्यान करावी लावावे
तुळशी पूजेचे लग्नाचे साहित्य मराठी ( Tulsi lagnache pujeche sahitya )
ऊस, लग्न मंडपाचे साहित्य, मिठाई, तूप, दिवा, धूप, सिंदूर, चंदन, नैवेद्य आणि फुले
👉तुळशीची आरती मराठी मध्ये | Tulsi aarti ची marathi lyrics | tulsi vivah marathi
जय देव जय देवी जय माये तुळशी ।
निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ॥ धृ. ॥
ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।
अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं ॥
सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी ॥ जय देवी. ॥ १ ॥
शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी ।
मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।
सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी ॥ जय देवी. ॥ २ ॥
अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी ॥
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥ ३ ॥
👉तुळशी च्या मराठी ओवी
पहीली माझी ओवी ग तुळशीच्या पाना सेवा करी कृष्ण कान्हा ये रे बा विठ्ठला
दुसरी माझी ओवी ग तुळशीचा नेम तुळशीखाली झोपे राम ये रे बा विठ्ठाला
तिसरी माझी ओवी ग तुळशीचे चरण तेहतिस कोटी देव शरण ये रे बा विठ्ठाला
चौथी माझी ओवी ग तुळशीचा भार वैष्णवांच्या गळा हार ये रे बा विठ्ठाला
पाचवी माझी ओवी ग तुळश पतिवत्रा ब्रम्ह विष्णु वरी सत्ता ये रे बा विठ्ठाला
सहावी माझी ओवी ग मला नाही आळस ज्ञानाचा तु कळस ये रे बा विठ्ठाला
सातवी माझी ओवी ग तुळशीच्या खोडा विठ्ठाल रूख्मिणीचा जोडा ये रे बा विठ्ठाला
👉तुळशी विवाह ची रांगोळी
माझ्या मित्रानो कशी वाटली तुळशी विवाह वरती मराठी मध्ये माहीती आम्ही तुम्हाला तुळशी विवाह चे मराठी उखाणे, तुळशी विवाह ची मराठी ओवी,तुळशी विवाह ची मंगळआष्टका, तुळशी विवाह च्या दिवशी या फोटो मधिल एक रांगोळी काढावी,तुळशी विवाह चा शुभ मुहर्त ,तुळशी ची आरती ,तुळशी विवाह ची पुजा कशी करावी ,या विषयी माहीती सांगितली आहे आम्हाला आशा आहे ही माहीती तुमच्या येणाय्रा तुळशी विवाह ला उपयोगी पडेल ही माहीती तुमच्या मित्र मैत्रिणी ना पाठवा आशिच प्रत्येक सणांची माहीती आम्ही तुमच्या पर्यंत पोहचत राहु त्या साठी आम्हाला फॉलो करा नाहीतर कडक मराठी उखाणे ऑनलाईन सर्च करा पुन्हा भेटुया आशाच नविन पोस्ट सोबत तो पर्यंत काळजी घ्या सोताची
🙏धन्यवाद🙏