नमस्कार मित्रानो आम्ही आपल्यासाठी समाज प्रबोधनकार श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर प्रेरणादायक विचार या लेख मध्ये घेऊन आलो आहोत.इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनाने नेहमीच चर्चेत असतात. विशेष म्हणजे त्यांच्या या कीर्तनाला नागरिकांची प्रचंड गर्दी असते. मात्र, काही वेळा त्यांचे विधान चांगलेच चर्चेत येतात.Indurikar Maharaj Quotes In Marathi | Indurikar Maharaj Thoughts In Marathi तुमच्या चर्चेत असलेले काही इंदुरीकर महाराज यांचे विधान घेऊन आलो आहे हे तुम्हाला नक्की आवडेल चला सुरू करूया.
जगातल सगळं जाणार फक्त एकच राहणार देव आणि देवाचं नाव
मी केलेल्या कर्माची फळे मला भोगायची आहे यातकोणी वाटेकरी नाही हे लोकांच्या ध्यानात नाही
संपत्ती कमावण्यापेक्षा संतती चांगली बनवा हि खरी संपत्ती आहे
लक्ष्मी प्रारब्धाने मिळते पण तिचा वापर जर योग्य केला नाही तर ती संतती खराब करते
Indurikar Maharaj Quotes In Marathi
ज्या घरामध्ये कमी कष्टाचा पैसा आहे त्या घरात रोग प्रवेश करत असतो ज्या घरात घामाचा पैसा आहे त्या घरात लक्ष्मी स्थिर राहते
आपल्या मुलांना दूध मिळालं नाही तर पिठाचं पाणी पाजा पण नवऱ्याने पापाने कमावलेल्या पैशाचे बदाम सुद्धा आपल्या पोरांना खायला घालू नका
ज्याने धर्म टिकवला ज्याने आई -वडिलांच्या डोळ्यात पाणी येऊ दिले नाही तो खरा श्रीमंत माणूस
माणसाची किंमत त्याच्या ज्ञानावर ठरवा
गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार संस्कार
जगाच्या इतिहासात माउली नंतर समाधी नाही तुकोबारायांतर वैकुंठगमन नाही शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही
भीक मागा पण स्वाभिमानाने जगा
नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकर्यांमध्ये बसून हरिपाठ पाठ करायला शिका
आपल्या लोकांची प्रगती झाली नाही याला एकमेव कारण म्हणजे आपल्या माणसांना आपले लोक मोठे झालेले सहन झाले नाही
indurikar-maharaj-status-in-marathi
शहाणी माणसं मरण पत्करतात पण अपमान पत्करत नाही
जी गोष्ट तुमच्याबरोबर काल नव्हती ती आज असेल पण आज असणारी गोष्ट उद्या असेलच असं नाही
जी गोष्ट तुम्हाला आज अनुकूल आहे ती उद्या असेलच असे नाही पण ईश्वरी तत्व तुमच्याबरोबर कालही होत आजही आहे उद्याही असणार आहे
तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच तुमचा या जगताशी संबंध आहे
जे तत्व आहे ते मिळवण्याचा निश्चय करा बाकीचे जे मिळणार आहे ते प्रारब्धाने मिळणार आहे
आपला माणूस कोणत्याहि क्षेत्रात मोठा झाला तर त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे
दिवस फिरतात घमेंड जास्त दिवस चालत नाही
जी माणसं तब्बेतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भुईमुगाला जास्त पाला असतो त्याला शेंगा कमी असतात
संसाराचा अनुभव कुणाला सांगू नये परंतु परमार्थाचा अनुभव दुसऱ्याला सांगितल्याशिवाय राहू नये
संसार कितीही करा शेवटी दुख्खच परमार्थात कितीही अनुभव घ्या शेवटी सुखच मिळते
संसारात वय वाढलं किंमत कमी झाली परमार्थात वय वाढलं किंमत वाढली
स्वाभिमानाने जगणाऱ्या माणसाला या जगामध्ये फुगीर म्हटले जाते आणि लाचार जगणाऱ्या माणसाला या जगामध्ये स्वाभिमानी म्हटले जाते
कर्मगती माणसाला कधी चुकत नाही
सुख आणि समाधान यात जमीन अस्मानाचा फरक आहे आज लोकांकडे सुख आहे परंतु समाधान नाही
कसे वाटले तुम्हाला आमचे हे इंदूरिकर महाराजांचे मराठी डायलॉग आवडले असेल तर कॉमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच नविन माहिती घेऊन तो पर्यंत काळजी घ्या
Marathi Ukhane For Bride | Click |
---|---|
Marathi Ukhane For Groom | Click |
Suhagrat Marathi Ukhane | Click |
What's App Challenge Ukhane | Click |
Ekadashi Marathi Ukhane | Click |
Ghas Bharavniche Ukhane | Click |
Dipawali Marathi Ukhane | Click |
Desh Bhakti Status | Click |
Navratri festival Ukhane | Click |
Makar Sankranti Ukhane | Click |
Suvichar in Marathi | Click |
Shiv Jayanti Marathi Ukhane | Click |
Marathi Mhanni | Click |
Hindi Status | Click |
Baby Shower Ukhane | Click |